तेल न वापरता बनवा टेस्टी पनीर भुर्जी!

By Harshada Bhirvandekar
Dec 09, 2024

Hindustan Times
Marathi

झिरो ऑइल कुकिंगचा ट्रेंड सध्या प्रचंड चर्चेत आहे. अनेकांनी या स्वयंपाक पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. 

आज आम्ही तुम्हाला तेल आणि क्रीम न वापरता पनीर भुर्जी कशी बनवायची याची खास रेसिपी सांगणार आहोत.

यासाठी लागणारे साहित्य : २०० ग्रॅम पनीर, दोन कांदे, दोन टोमॅटो, हिरवी मिरची, आले, मीठ आणि हळद.

स्टेप १:  सर्वप्रथम कांदा, टोमॅटो, आले आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.

स्टेप २ : आता एक नॉनस्टिक तवा गरम करून घ्या आणि त्यात जिरे टाकून ते तडतडू द्या. जिऱ्याचा खमंग वास येऊ लागला की, त्यात आले आणि हिरवी मिरची टाका.

स्टेप ३ : त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतून घ्या. यानंतर त्यात सगळे मसालेही टाका.

स्टेप ४: मसाले जळू नयेत म्हणून त्यात थोडेसे पाणी घालू शकता. मसाल्याचा सुगंध यायला लागला की, त्यात पनीर कुस्करून टाका.

मध्यम आचेवर पाच ते सात मिनिटे ही पनीर भुर्जी शिजू द्या. यानंतर वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा