बनवा मोड आलेल्या मुगाचं सूप पौष्टिक सूप!

By Harshada Bhirvandekar
Dec 23, 2024

Hindustan Times
Marathi

मोड आलेले मूग आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात. यापासून तुम्ही सूप देखील बनवू शकता.

मुगाचे सूप आरोग्यदायी आहेच, पण चविष्ट देखील आहे. हिवाळ्यात हे सूप शरीराला ऊब देखील देते. 

साहित्य : मोड आलेले मूग, लसूण, आले, कांदा, मीठ, कळीमिरी, धणे, आणि लिंबाचा रस.

मोड आलेले मूग धुवून व्यवस्थित उकडून घ्या, आणि जाडसर वाटून घ्या.

एका कढईत तेल गरम करून, त्यात कांदा, आलं, लसूण परतून घ्या.

हे मिश्रण रंग बदलू लागलं की, त्यात मुगाचे वाटण घालून शिजवा. गरजेनुसार पाणी घाला.

वरून मीठ, मिरपूड, आणि इतर मसाले घालून सूप ८-१० मिनिटे शिजू द्या.

आता कोथिंबीरीने हे सूप सजवा आणि सर्व्ह करा. चवीसाठी यात लिंबाचा रस देखील घालू शकता.

देखणी टिकली!  अनन्या पांडेचा हा अंदाज बघाच!