घरच्या घरी बनवा चटपटीत बनारसी टोमॅटो चाट!

By Harshada Bhirvandekar
Feb 01, 2025

Hindustan Times
Marathi

बनारसी टोमॅटो चाट हा पदार्थ त्याच्या आंबट गोड चवीसाठी अतिशय लोकप्रिय आहे. तुम्ही हा घरी देखील बनवू शकता. 

साहित्य : टोमॅटो, उकडलेले बटाटे, जिरे, हिंग, कोथिंबीर, चिंचेची चटणी, चाट मसाला, मीठ.

टोमॅटो आणि उकडलेले बटाटे तुकड्यांमध्ये कापून घ्या. चिंचेची चटणी वाटीत काढून घ्या. 

कढईत तेल गरम करून त्यात जिरं आणि हिंग घालून फोडणी करा. त्यात टोमॅटो, बटाटे घालून परतून घ्या.

टोमॅटो शिजून नरम झाले की, त्यात कोथिंबीर, चाट मसाला, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. 

या मिश्रणात चटणी घाला आणि काही मिनिटे शिजवून घ्या. यामुळे सगळ्यांची आणखी खुलून येईल.

आता गरमा गरम टोमॅटो चाटला एका वाटीत काढा आणि वरून जिरे पावडर भुरभुरा.

आता वरून कोथिंबीर आणि शेव घालून सजवा. तयार आहे तुमचं बनारसी टोमॅटो चाट! 

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay