रव्यापासून बनवा सॉफ्ट, टेस्टी गुलाबजाम! 

By Harshada Bhirvandekar
Dec 30, 2024

Hindustan Times
Marathi

रव्याचा शिरा, चीला, उपमा असे अनेक पदार्थ तुम्ही नक्कीच खाल्ले असतील. पण, रव्यापासून टेस्टी गुलाबजाम देखील बनवता येतात.

रव्याचे गुलाबजाम बनवणे अगदी सोपे आहे. शिवाय हे गुलाबजाम चवीला देखील कमाल लागतात.

रव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य : रवा, दूध, तूप, साखर, वेलची, आणि तळणीसाठी तेल किंवा तूप

पाक तयार करण्यासाठी साखर, पाणी मिसळून एकतारी पाक बनवा. यात वेलची पूड करून घाला.

दुसऱ्या एका भांड्यात तूप गरम करून, त्यात दूध घालून उकळी येऊ द्या. आता यात थोडा थोडा रवा घालत मिश्रण तयार करा. 

रवा व्यवस्थित शिजेपर्यंत ढवळत राहा. थोडे थंड झाले की, व्यवस्थित मळून घ्या.

या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून तेल किंवा तुपात तळून घ्या. हे गोळे पाकात बुडवून ठेवा.

तयार आहेत तुमचे रव्याचे गुलाबजाम! वरून ड्रायफ्रूटस घालून हे गुलाबजाम सर्व्ह करा.

लग्नापूर्वी जोडीदाराला विचारा 'हे' ५ प्रश्न!