लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!

By Harshada Bhirvandekar
Jan 22, 2025

Hindustan Times
Marathi

हिवाळ्यात चिक्की खाण्याचा आनंद वेगळाच असतो. चिक्की गूळ आणि शेंगदाणे घालून बनवली जाते.

यावेळी काहीतरी नवीन करून पहायचे असेल, तर तुम्ही चॉकलेट चिक्की बनवू शकता.

चॉकलेट चिक्की बनवण्यासाठी साहित्य : वितळवलेले चॉकलेट, गूळ, शेंगदाणे, तूप 

सर्वप्रथम शेंगदाणे भाजून त्याची साले काढून घ्या.

मंद आचेवर एक भांड्यात गूळ वितळवून त्यात शेंगदाणे घाला.

एका ट्रेमध्ये किंवा पसरट ताटात हे मिश्रण पसरवून घ्या. थोडे सेट झाले की त्यावर वितळलेले चॉकलेट घाला. 

चॉकलेट सेट होऊन चिक्कीवर सेट करायला ठेवा आणि नंतर त्याचे चौकोनी तुकडे करा.

तयार आहे तुमची स्वादिष्ट चॉकलेट चिक्की! ही चिक्की ८-१० दिवस टिकून राहते.   

दाक्षिणात्य अभिनेत्रीने सांगितला साऊथ आणि बॉलीवुड इंडस्ट्रीतील फरक