बहुतेक भारतीय घरांमध्ये संध्याकाळी चहासोबत भरपूर नमकीन तयार केले जातात. त्यामुळेच आज आपण नमकीन मुगडाळ रेसिपी पाहूया...
साहित्य- १ वाटी मूग डाळ, अर्धा टीस्पून काश्मिरी लाल तिखट, तळण्यासाठी तेल
अर्धा टीस्पून चाट मसाला, चवीनुसार मीठ
सर्वप्रथम १ कप मूग डाळ स्वच्छ करून ४-५ तास पाण्यात भिजत ठेवा.
यानंतर पाणी पूर्णपणे काढून टाकावे. भिजवलेली मूग डाळ काढून पेपर टॉवेलवर पसरवा.
एका कढईत तेल गरम करून मग एका जाळीच्या चमच्याने थोडी थोडी मूग डाळ काढून तळून घ्या.
सतत ढवळत असताना गरम तेलात तळून घ्या. मूग डाळ कुरकुरीत झाल्यावर पेपर टॉवेलवर काढा.
थोडं थंड झाल्यावर नीट चोळा. मूग डाळीत अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. चांगले मिसळा. तयार नमकीन साठवा आणि चहाचा आनंद घ्या.