गोडाधोडासाठी बनवा गाजराचा केक! आताच लिहून घ्या रेसिपी

By Harshada Bhirvandekar
Dec 24, 2024

Hindustan Times
Marathi

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात गाजर भरपूर प्रमाणात विक्रीसाठी येतात.

या काळात गाजराचा हलवा तर सगळेच खातात, पण तुम्ही गाजराचा केक ट्राय करू शकता.

गाजराचा केक चवदार तर आहे, पण बनवायला देखील अतिशय सोपा आहे.

साहित्य : गाजर, मैदा, साखर, दही, तेल, बेकिंग पावडर, वेलची पावडर, सुकामेवा

सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून घ्या आणि नीट किसून घ्या.

मैदा, बेकिंग पावडर आणि पिठीसाखर एकत्र चाळून घ्या आणि त्यात दही, तेल घालून चांगले फेटून घ्या.

आता मिश्रणात किसलेले गाजर आणि वेलची पूड घाला.

आता हे मिश्रण एका केकच्या साच्यात पीठ घाला आणि ड्रायफ्रूटस टाका.

केक बेक करा आणि मलईने सजवून सर्व्ह करा.

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी