हिंदू धर्मात मकर संक्रांती हा नवीन वर्षातील पहिला खास सण मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे.
पंचांगानुसार, या वर्षी १४ जानेवारी २०२५ रोजी मकर संक्रांती सण साजरा केला जात आहे.
मान्यतेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी ऐश्वर्य, सुख-सौभाग्य, समृद्धी आणि अपार धनाच्या प्राप्तीसाठी या खास गोष्टी करा.
मकर संक्रांतीच्या दिवशी पिता सूर्यदेव आपल्या पुत्र शनिवरचा राग विसरून त्याच्या घरी गेले होते असे सांगितले जाते.
मान्यतेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवाची मनोभावे पूजा केल्याने शनिदोष दूर होतात आणि आर्थिक अडचण दूर होते.
मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान केल्याने हजारपट पुण्य मिळते, असे सांगितले जाते.
मकर संक्रांती हा दान-पुण्याचा सर्वश्रेष्ठ काळ मानला गेला आहे. या दिवशी गुड, तूप, तीळ आणि खिचडीचे दान करणे फार शुभ मानले जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्यात शुद्ध पाणी भरून त्यात कुंकू, अक्षदा, काळे तीळ आणि लाल फूल टाकून ऊँ घृणि सूर्याय नम: हा मंत्र म्हणून सूर्यदेवाला जल अर्पण करा.
मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी विधीनुसार सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.