कुंभमेळा २०२५ : कल्पवास काय आहे? जाणून घ्या याचे नियम
By
Priyanka Chetan Mali
Dec 30, 2024
Hindustan Times
Marathi
दरवर्षी १२ वर्षानंतर महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा मेळा असतो.
यावर्षी महाकुंभ मेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. याची सुरवात १३ जानेवारी पासून होत असून, २६ फेब्रुवारीला मेळा समाप्त होईल.
महाकुंभ मेळ्या दरम्यान अनेक श्रद्धाळू भाविक कल्पवास करतात. जाणून घ्या कल्पवास म्हणजे काय आणि याचे नियम काय आहेत.
कल्पवास ही एक कठीण तपश्चर्या आणि भगवंताची भक्ती आहे, ज्याद्वारे साधक आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल करतो.
मान्यतेनुसार कल्पवास केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि देवाच्या चरणी स्थान प्राप्त होते.
कल्पवास करण्यासाठी अनेक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यात शिस्त आणि संयमाकडे विशेष लक्ष दिले जाते.
कल्पवासासाठी भक्तांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमाजवळ राहावे.
कल्पावासात फक्त सात्विक आहार घेणे आणि मांसाहारापासून दूर राहणे बंधनकारक आहे.
कल्पवासात दररोज पूजा, दान आणि भजन-कीर्तन करावे. तुम्ही ४५ दिवस कल्पवास करू शकतात.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
Enter text Here
पुढील स्टोरी क्लिक करा