मौनी अमावस्येला महाकुंभ स्नान करताना घ्या या गोष्टींची काळजी

By Priyanka Chetan Mali
Jan 24, 2025

Hindustan Times
Marathi

महाकुंभ मेळ्यातील दुसरे शाही स्नान २९ जानेवारी २०२५ ला मौनी अमावस्येला आहे. मौनी अमावस्येला स्नान-दानाचे खास महत्व आहे.

तुम्हीही मौनी अमावस्येला महाकुंभ मेळ्यात स्नानासाठी जाणार असाल, तर या काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

कुंभ स्नान आपण शरीराचा मळ दूर करण्यासाठी नव्हे तर मनाचा मळ दूर करण्यासाठी करतो.

जर तुम्ही महाकुंभ मेळ्यात स्नान करण्यासाठी जाणार असाल तर घरूनही स्वच्छ पाण्याने स्नान करून जा. यामुळे कुंभचे पावित्र्य टिकून राहील.

महाकुंभात ३ वेळा डुबकी लावण्याचा नियम आहे. पहिली डुबकी कल्याणासाठी घ्यावी, दुसरी डुबकी आई-वडिलांच्या नावाने घ्यावी आणि तिसरी डुबकी गुरुंच्या नावाने घ्यावी.

महाकुंभ मेळ्यातून घरी परत येतांना संगमचे पाणी आणि तिथली माती सोबत नक्की आणावी.

मान्यतेनुसार संगमाचे पाणी आणि माती घरात ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

असे सांगितले जाते की, तुम्ही मनोभावे आणि निर्मळ मनाने कुंभ मेळ्यात स्नान केले तर, तुम्हाला शुफ फळ प्राप्त होतात.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

जया एकादशीला विष्णू देवाला अर्पण करा या पदार्थांचा नैवेद्य