कुंभमेळा : संगम नगरीत आहे भीष्म पितामह यांचे अनोखे मंदिर

By Priyanka Chetan Mali
Jan 16, 2025

Hindustan Times
Marathi

प्रयागराज येथे सर्वात मोठा धार्मिक महाकुंभ मेळा सुरू आहे. करोडोच्या संख्येत भाविक संगमात पुण्यस्नानासाठी येत आहे.

स्नानानंतर भाविक येथील प्राचीन मंदिरातही जात आहे. यातलेच एक मंदिर भीष्म पितामह यांचे आहे.

गंगेच्या काठी दारागंज येथील नाग वासुकी मंदिराच्या मुख्य दरवाजावर हजारो वर्ष जुने भीष्म पितामह यांचे मंदिर आहे.

या मंदिरात भीष्म पितामह यांची मुर्ती विश्रांती मुद्रेत आहे.

कुरूक्षेत्राच्या मैदानावर जेव्हा अर्जुनाने भीष्म पितामह यांना बाणांच्या शय्येवर झोपवले होते. तीच प्रतिमा या मंदिरात आहे.

भाविक विशेषत: दिवाळी आणि पितृहक्षात या मंदिरात दिवे लावण्यासाठी येतात.

या मंदिरातील भीष्म पितामह यांची मुर्ती सुमारे १२ फुट लांब आहे.

महाकुंभ मेळा असल्यामुळे या मंदिराचातही काही बदल करण्यात आले असून, हे मंदिर पहिल्यापेक्षा जास्त आकर्षक वाटू लागले आहे.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS