महाकुंभ मेळ्यातून 'या' ४ गोष्टी आणा घरी, कुटुंबात नांदेल सुख-समृद्धी!
By
Priyanka Chetan Mali
Dec 22, 2024
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात महाकुंभ मेळ्याचे खास महत्व आहे. हा मेळा १२ वर्षानंतर असतो.
१३ जानेवारी २०२५ पासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याची सुरवात होत आहे. महाकुंभ मेळ्यात स्नान केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं.
महाकुंभ मेळ्याला स्नानासाठी जाणार असाल तर आपल्या घरी इथून कोणत्या गोष्टी अवश्य आणाव्या ते जाणून घ्या.
प्रयागराजमध्ये तीन पवित्र नद्या गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम आहे. यामुळे या संगमची माती घरी नक्की आणा.
मान्यतेनुसार, या पवित्र नद्यांच्या संगमाची माती आपल्या देवघराच्या मुख्य दारात ठेवल्याने सकारात्मकता वाढते.
महाकुंभ मेळ्यातून तुळशीचं रोपही आणू शकतात. ही तुळस लावल्याने गरीबी दूर होते आणि आर्थिक स्थिती सुधारते असे सांगितले जाते.
महाकुंभला जाऊन स्नान केल्यावर गंगाजल नक्की आणा. या गंगाजलाचा पूजा करताना वापर करावा.
महाकुंभ मेळ्यातून शिवलिंग आणायला विसरू नका, असे म्हणतात की या शिवलिंगाच्या पूजेने घरातील आनंद वाढतो.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा