स्टिव्ह जॉब्सची पत्नी लॉरेन यांचे आध्यात्मिक गुरु कौन आहेत? 

By Ninad Vijayrao Deshmukh
Jan 16, 2025

Hindustan Times
Marathi

प्रयागराय येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात देशविदेशातून कल्पवासासाठी परदेशी नागरिक आले आहेत. या पैकी एक आहेत स्टिव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल. 

लॉरेन पॉवेल यांच्याबद्दल अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. या पैकी एक चर्चा अशी सुरू आहे की, लॉरेन पॉवेल या कुणाच्या शिष्या आहेत ? 

अॅपलचे फाऊंडर राहिलेले स्टिव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल या स्वामी महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पवास करत आहेत. 

स्वामी महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांनी पॉवेल यांना त्यांचं गोत्र देऊन एक नवी दिशा दाखवली आहे. त्यांनी कमला असे नावे नाव देखील पॉवेल यांना दिले आहे.  

महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी स्वामी हे निरंजनी आखाड्याचे पिठाधीश्वर आहेत. 

संतांमध्ये शंकराचार्य हे पद मोठ असतं. महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांना संतांमधील मोठा चेहरा समजलं जातं. 

स्वामी  कैलाशानंद गिरी २०२१ मध्ये निरंजन आखड्याचे आचार्य महामंडलेश्वर झाले. या पूर्वी ते अग्नि आखड्याचे महामंडलेश्वर होते. 

कैलाशानंद गिरी महाराज यांचा जन्म १९७६ मध्ये बिहार राज्यातील जमूई जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. 

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान