प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभ मेळ्यात देशभरातून नागा साधू येत आहेत. हे नागा साधू येणाऱ्या भाविकांचं खास आकर्षण आहे.
कुंभमेळ्यासाठी नागासाधू दोन आखाड्यातून येतात. एक आखाडा वाराणसी येथील महापरिनिर्वाण आखाडा तर दूसरा आहे पंच दशमान जुना आखाडा.
पण कुंभ मेळा झाल्यावर हे नागा साधू दिसत नाहीत. त्यामुळे ते कोठे जातात याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे ते कोठे जातात हा प्रश्न उपस्थित होतो.
नागा साधू इतर दिवशी दिगंबर स्वरूपात म्हणजे नग्न स्वरूपात राहत नाहीत. ते कपडे परिधान करतात. समाजात दिगंबर स्वरूप मान्य नाही.
जेव्हा कुंभमेळा संपतो तेव्हा ने नागा साधू त्यांच्या त्यांच्या आखाड्यात चालले जातात. या आखाड्यात नागा साधू ध्यान धारणा करतात तसेच धार्मिक शिक्षण घेत असतात व देत असतात.
बहुतांश नागा साधू, जंगलात, हिमालयात तसेच एकांत स्थानात ध्यान धारणा करण्यासाठी जात असतात.
नागा साधू देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रावर देखील राहतात. यात नाशिक, प्रयागराज, उज्जेन आणि हरिद्वार यांचा समावेश आहे.