शिवलिंगावर तूपाचा अभिषेक केल्याने होतात ‘हे’ फायदे!

By Harshada Bhirvandekar
Apr 10, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मातील लोकांची भगवान शंकरावर सर्वाधिक श्रद्धा आहे. त्यांना देवांचा देव ‘महादेव’ असे म्हटले जाते.

भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताची सर्व दुःखे दूर होतात. भगवान शंकराची पूजा करण्यासाठी सोमवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. 

असे म्हणतात की, विधिवत पद्धतीने शिवलिंगाची पूजा केल्यास भगवान शंकराची कृपा राहते आणि मनोकामना पूर्ण होतात. 

शिवलिंगाच्या पूजेसाठी अनेक नियम सांगितले गेले आहेत, शिवलिंगावर काय अर्पण करावे आणि काय करू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. 

शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने कोणते फायदे होतात, हे जाणून घेऊयात...  

शिवलिंगावर तूप अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तूपाचा अभिषेक केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. 

सोमवारी शिवलिंगावर तूप अर्पण करावे, अशी धार्मिक मान्यता आहे. असे मानले जाते की सोमवार हा भगवान शिवाचा वार आहे. 

शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने व्यक्तीला अपेक्षित परिणाम मिळून सुख समृद्धी प्राप्त होते. 

शिवलिंगाला तूप अर्पण करताना या मंत्रांचा जप करावा. ओम नमः शिवाय|| ओम सोमेश्वराय नमः|| ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

आयपीएलमधील सर्वात मोठा विजय