मॅग्नेशियम वाढवते मेंदूचे आरोग्य, पाहा याचे फायदे

pixabay

By Hiral Shriram Gawande
Feb 12, 2024

Hindustan Times
Marathi

मूड नियंत्रित करण्यापासून ते झोपेची गुणवत्ता सुधारण्यापर्यंत मॅग्नेशियम मेंदूच्या आरोग्याला सपोर्ट करते. 

pixabay

मॅग्नेशियम सामान्यतः सीड्स, हिरव्या भाज्या, धान्ये आणि सीफूडमध्ये आढळतात. मेंदूच्या कार्यामध्ये आणि मेंदूच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

pixabay

मॅग्नेशियम मानसिक आरोग्यास समर्थन देण्यासाठी, विविध जैविक प्रणालींवर आणि मेंदूच्या कार्यासाठी आणि भावनांच्या नियमनासाठी महत्त्वपूर्ण प्रक्रियांवर प्रभाव पाडण्यात बहुआयामी भूमिका बजावते," असे निसर्गोपचार तज्ञ सांगतात. 

pixabay

मॅग्नेशियम सिंथेसाइस आणि न्यूरोट्रांसमीटर सोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ज्यामुळे मूड नियंत्रित करण्यात आणि तणावाला प्रतिसाद देण्यास मदत होते.

pixabay

मॅग्नेशियम हायपोथालेमिक-पिट्यूटरी-एड्रेनल (एचपीए) चे नियमन करण्यास मदत करते. तणाव आणि चिंता नियंत्रित करण्यास मदत करते.

pixabay

मॅग्नेशियमचा मज्जासंस्थेवर शांत प्रभाव पडतो आणि तो रिलॅक्स करण्यास मदत करतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.

pixabay

तीव्र इंफ्लेमेशन अनेक मानसिक विकारांशी जोडला गेला आहे, जसे नैराश्य आणि चिंता. मॅग्नेशियम त्याच्या अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मांसह असे धोके कमी करण्यास मदत करते.

pixabay

मॅग्नेशियम न्यूरोट्रांसमीटर प्रणालीवर प्रभाव टाकण्यास मदत करते. मूड स्थिर करते आणि मूड डिसऑर्डरवर उपचार करण्यास मदत करते.

pixabay

रोज बदाम खाण्याचे आहेत ‘६’ मोठे फायदे!

pixabay