हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला खास महत्व आहे. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला माघ पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमा म्हणतात.
माघ पौर्णिमेला स्नान-दान केल्याने शुभ फळ प्राप्त होते. असे सांगितले जाते की, या दिवशी चंद्र देवासह लक्ष्मी देवीचीही मनोभावे पूजा करावी.
शास्त्रानुसार, माघ पौर्णिमेला दान-दक्षिणा देण्यालाही खास महत्व आहे. या दिवशी दान केल्याने ३२ पट फळ प्राप्त होते.
जाणून घ्या माघ पौर्णिमेला कोणते सोपे उपाय केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी वाढेल.
पुराणानुसार, माघ पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. असे सांगितले जाते की या दिवशी भगवान विष्णू गंगाजलात राहतात.
माघ पौर्णिमेला भगवान विष्णूच्या पूजेसह लक्ष्मी देवीचीही पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी लक्ष्मी देवीला पिवळे वस्त्र आणि लाल रंगाच्या वस्तू अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते.
माघ पौर्णिमेला लक्ष्मी देवीची पूजा केल्याने श्रीसूक्ताचे पठण केले पाहिजे. असे केल्याने लक्ष्मी देवी सुख-समृद्धीचा आशीर्वाद देते.
माघ पौर्णिमेच्या दिवशी नदीवर दीपदान करणाऱ्याला महत्व आहे. यामुळे देवी-देवता प्रसन्न होतात आणि पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते.
माघ पौर्णिमेला ११ कवड्यांना हळद लावून लक्ष्मीला अर्पण केल्याने आर्थिक चणचण भासत नाही. पूजेनंतर या कवड्या लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवून द्या.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.