माघ पौर्णिमेला या ठिकाणी दिवे लावल्यास प्रसन्न होईल देवी लक्ष्मी

By Priyanka Chetan Mali
Feb 10, 2025

Hindustan Times
Marathi

बुधवार १२ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा केली जाते.

तसेच, पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर खास जागांवर नक्की दिवे लावले पाहिजेत.

धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेला दिवा लावल्याने लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख-समृद्धीत वृद्धी होते.

अशात जाणून घेऊया माघ पौर्णिमेला कुठे कुठे दिवे लावले पाहिजेत.

माघ पौर्णिमेची पूजा करताना शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि देवाची आरती करा.

या दरम्यान भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करा. असे सांगितले जाते की यामुळे पूजा यशस्वी होते.

माघ पौर्णिमेला तुळशीच्या पूजेत शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीची आरती करा.

माघ पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा.

यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि धनलाभाचे खास योग तयार होतील तसेच आर्थिक अडचणी दूर होतील.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

ड्रॅगन फ्रूटचे 'हे' भन्नाट फायदे महितीयत?