माघ गुप्त नवरात्रीत करा ही विशेष कामे

By Priyanka Chetan Mali
Feb 11, 2024

Hindustan Times
Marathi

शनिवार १० फेब्रुवारी पासून माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीला सुरुवात झाली असून, सांगता १८ फेब्रुवारी रविवारी होईल.

नवरात्री काळात शुद्ध सात्विक भोजन घ्यावे. इच्छा असल्यास-शरीर प्रकृती नुसार एकभुक्त उपवास करावा.

ब्रम्हचर्याचे पालन करावे. पलंग,बेड यांचा शयनासाठी वापर न करता जमिनीवर अंथरून-चटई घोंगडी वापरून शयन करावे.

आई भगवतीची सेवा पाठ म्हणजेच श्री सूक्त पठण, श्री  दुर्गा सप्तशती पाठ, नवार्णव मंत्र जप, सिद्ध कुंजीका स्तोत्र पाठ, देवीचे स्तोत्र वाचन करावे. 

दररोज सकाळी सूर्य देवतेचे स्तोत्र पठण, विष्णुसहस्रनाम पठण ,इतर मंत्र इत्यादी विशिष्ट संख्येत जप, पठण, नामस्मरण करावे.

देवी भगवतीच्या उपासनेसाठी जे काही कराल ते वाच्यता ही न करता करावे.कारण गुप्त नवरात्रीमध्ये उपासना गुप्त असावी.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

फ्रीजमध्ये अन्न जास्त काळ ताजे राहण्यासाठी टिप्स