देवी दुर्गा यंदा कोणत्या वाहनाने येणार? 

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 22, 2024

Hindustan Times
Marathi

चैत्र महिन्यात येणारी नवरात्र चैत्र नवरात्र म्हणून ओळखली जाते आणि शरद ऋतूतील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात. 

चैत्र महिन्याच्या पहिल्या तारखेपासून नवरात्रीला सुरुवात होते. हिंदू नववर्षही या दिवसापासून सुरू होते.

नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या ९ रूपांची पूजा करून तिला प्रसन्न करून तिचा आशीर्वाद मिळवला जातो. 

नवरात्रीमध्ये माता राणीचे पठण केल्याने देवी भगवतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

यावेळी चैत्र नवरात्रीची सुरुवात ९ एप्रिलपासून म्हणजेच मंगळवारपासून होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ६:०१ ते १०:१५ पर्यंत असेल.

यंदा चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेचे वाहन घोडा असेल. माता राणी घोड्यावर स्वार होऊन येईल.

दुर्गेचे वाहन कोणते असेल? हे नवरात्र कोणत्या दिवसापासून सुरू होत आहे यावर अवलंबून आहे.

यंदा नवरात्री (९ एप्रिल) मंगळवारपासून सुरुवात होत आहे, त्यामुळे यावेळी दुर्गेचे वाहन अश्व म्हणजेच घोडा असेल.

देवी दुर्गा घोड्यावर स्वार होणे शुभ मानले जात नाही. दुर्गा घोड्यावर स्वार होऊन येणे हे आपत्तीचे संकेत आहे. 

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!