सकाळच्या या ५ चुकांनी देवी लक्ष्मी होत नाही प्रसन्न

By Priyanka Chetan Mali
Feb 07, 2024

Hindustan Times
Marathi

लक्ष्मी माता धन-संपत्तीची देवी आहे. देवीच्या कृपेने व्यक्तिच्या जीवनात धन-धान्याची भरभराट राहते.

जाणून घ्या कोण-कोणत्या कारणाने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

सकाळी सूर्योदयानंतर उशीरापर्यंत जे झोपतात त्यांच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होत नाही, असे सांगितले जाते.

असे सांगितले जाते की, ज्या घरात सकाळी उठताबरोबरच मतभेद आणि वाद-विवाद सुरू होऊन जातात त्या घरात लक्ष्मी राहत नाही.

लक्ष्मी देवीचा प्रवेश मुख्य दरवाजातून होतो. सूर्योदयाआधी मुख्यद्वाराजवळ स्वच्छता नसली, साफ-सफाई झालेली नसली तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही.

मान्यता आहे की तुळशीमध्ये लक्ष्मी विराजमान असते. सकाळी आंघोळ न करता तुळशीची पाने तोडणे अशुभ मानले जाते.

सकाळी सकाळी जर दरवाजासमोर गाय आली तर त्या गायीला हाकलू नका, असे केल्याने देवी लक्ष्मी क्रोधीत होते, असे सांगितले जाते. 

ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

उन्हाळ्यात हळद वापरल्याने मिळतील एवढे ब्युटी बेनिफिट्स

pixabay