तुळजाच्या मेहंदीवर सूर्याच्या प्रेमाचे रंग!
By
Harshada Bhirvandekar
Aug 29, 2024
Hindustan Times
Marathi
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाची लगबग सुरु आहे.
दारात मांडव घातला जातोय, पण तुळजाला हे लग्न करायचं नाहीये.
सुर्या तिचं आणि सिद्धार्थचं बोलणं करून देतो आणि पुन्हा एकदा तुळजाला वचन देतो की, तुझं लग्न मी सिद्धार्थ सोबतच लावून देईन.
आता सूर्या आणि तुळजाचं हे बोलणं भाग्यश्री हे ऐकते. हे ऐकून आता तिलाही धक्का बसला आहे.
भाग्यश्री धावत जाऊन हे तेजू, धनु आणि राजुला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
दुसरीकडे तुळजाचा मेहंदी समारंभ सुरु आहे. सगळं वऱ्हाड रिसॉर्टवर जाण्यासाठी निघणार आहे.
याच रिसॉर्टमध्ये तुळजा आणि सत्यजितचा लग्न समारंभ पार पडणार आहे.
तुळजा आणि सत्यजितच्या या लग्नासाठी गावातून चक्क दोन बस भरून व्हराडी निघणार आहेत.
आता सूर्याला आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागेल का? काय होईल तुळजाच्या लग्न मंडपात? हे लवकरच कळणार आहे.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा