शीतलीचा ‘अज्या’ कसा बनला चार बहिणींचा ‘सूर्या दादा’?

By Harshada Bhirvandekar
Jul 02, 2024

Hindustan Times
Marathi

नव्या मालिकांच्या मांदियाळीत आता आणखीन एका नवीन मालिकेची भर पडली आहे ती म्हणजे 'लाखात एक आमचा दादा'. 

भावा-बहिणींच्या नात्यांवर आधारित या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण ‘सूर्यादादा’ची भूमिका साकारत आहे.

नितीश चव्हाणने नुकतेच मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना त्याला ही मालिका कशी मिळाली याबद्दल सांगितले.

‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेसाठी नितीशला वज्र प्रोडक्शनमधून फोन आला होता. फोनवरच त्याला कथा ऐकवण्यात आली होती.

या मालिकेची एक भाऊ आणि त्याच्या चार बहिणींची कथा नितीशला आवडली आणि त्याने ही मालिका करायचे ठरवले.

नितीशची पहिली मालिका देखील झी मराठी आणि वज्र प्रोडक्शन सोबत होती आणि आता पुन्हा एकदा आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटतंय, असं तो म्हणाला.

‘सूर्यादादा’ साकारण्याबद्दल बोलताना नितीश म्हणाला की, मला सख्खी बहीण नाही, पण या मालिकेच्या निमित्ताने बहिणीचं प्रेम अनुभवता येतंय.

मालिकेत सूर्याच्या खांदयावर ४ बहिणींची जबाबदारी आहे, खऱ्या आयुष्यात मी कोणाचा दादा नाही पण मला एक दादा आहे त्याचे नाव आहे. 

सूर्यादादाच्या लूकचीही चर्चा होत आहे. लोकांना सूर्याचा लूक आवडतोय. मला प्रतिसाद पाहून खूप भारी वाटतंय, असं नितीश म्हणाला.

चिया सीड्सचे फायदे