‘लापता लेडीज’च्या ‘जया’चं ‘हीरामंडी’शी खास कनेक्शन!
By
Harshada Bhirvandekar
May 05, 2024
Hindustan Times
Marathi
किरण राव निर्मित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘जया’ या पात्राची देखील भरपूर चर्चा झाली.
हिमाचल प्रदेशातील शिमला येथील प्रतिभा रंटा या अभिनेत्रीने ‘लापता लेडीज’मध्ये ‘जया’ची भूमिका साकारली आहे.
प्रतिभाने २०२०मध्ये मालिकेतून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. ‘कुर्बान हुआ’ या मालिकेत ती झळकली होती.
मात्र, काही काळानंतर तिचं मालिकांमधून मन उडालं. यानंतर तिने चित्रपटांसाठी ऑडिशन द्यायचं ठरवलं आणि ‘लापता लेडीज’साठी तिची निवड झाली.
‘लापता लेडीज’मध्ये प्रतिभाने ‘जया’ नावाचे पात्र साकारले आहे. या पात्रातून तिचा अभिनय लोकांना आवडला आहे.
‘लापता लेडीज’नंतर तिला ‘हीरामंडी’मध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. या सीरिजमध्ये तिने संजिदा शेखची मुलगी ‘शमा’ साकारली आहे.
प्रतिभाने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘लापता लेडीज’चं शूटिंग संपलं आणि त्याचवेळी तिला ‘हीरामंडी’मधील शमाची भूमिका ऑफर झाली.
प्रतिभा रांटा प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय सुंदर आणि स्टायलिश आहे. तिचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
अभिनयासोबतच प्रतिभा फिटनेसच्या बाबतीत देखील खूप सजग आहे. ती दररोज योगा करते. यासोबतच ती एक चांगली डान्सर देखील आहे.
‘भंवर सिंह शेखावत’कडे एकूण किती संपत्ती आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा