कुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या अमृत स्नानाचे काय महत्व आहे?
By
Priyanka Chetan Mali
Jan 28, 2025
Hindustan Times
Marathi
उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळा २०२५ चे पुढचे अमृत स्नान मौनी अमावस्येला २९ जानेवारी २०२५ रोजी आहे.
हिंदू धर्मात मौनी अमावस्याचे खास महत्व आहे. परंतू महाकुंभ मध्ये अमावस्या तिथी फार महत्वपूर्ण होऊन जाते.
जाणून घेऊया महाकुंभात मौनी अमावस्येचे अमृत स्नान इतके महत्वाचे का आहे ते.
मान्यतेनुसार मौनी अमावस्येला कुंभ मेळ्यात स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो.
महाकुंभ दरम्यान मौनी अमावस्याची तिथी पडते तेव्हा याचे महत्व अधिकच वाढून जाते.
मौनी अमावस्या दरम्यान चंद्र आणि सूर्य एकाच राशीत असतात, ज्यामुळे विशिष्ट ऊर्जेचा संचार होतो. ही ऊर्जा ध्यान-धारणेसाठी फारच शुभ मानली जाते.
महाकुंभमध्ये अमावस्या तिथीला स्नान केल्याने व्यक्तीला नवीन ऊर्जा आणि दिशा प्राप्त होते.
ज्योतिषानुसार, मौनी अमावस्येच्या खास दिवशी चंद्र, बुध आणि सूर्य मकर राशीत त्रिवेणी योग तयार करताय. हा एक दुर्लभ संयोग आहे.
मौनी अमावस्येच्या दिवशी कुंभस्नानासह इतर पवित्र नद्यांमध्येही स्नानाला महत्व आहे. या दिवशी स्नान केल्यानंतर गरजूंना दान पण दिले जाते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
लिंबाचे सरबत
नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे
PEXELS
पुढील स्टोरी क्लिक करा