प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला १३ जानेवारी २०२५ ला सुरवात झाली आहे. महाकुंभ मेळ्यात पुण्य स्नानासाठी देश-विदेशातून भाविक येत आहे.
महाकुंभ मेळ्यासोबतच प्रयागराज येथील संगमाच्या काठावरील अक्षय वड ही चर्चेचा विषय आहे. हा वटवृक्ष फार जुना आहे.
अक्षय वड हा अमर मानला जातो, त्याचे अस्तित्व सृष्टीच्या प्रारंभापासून आहे असे म्हणतात.
हिंदू धर्मग्रंथानुसार अक्षय वडाच्या झाडाचे पूजन केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये अक्षय वडचा उल्लेख आहे.
अक्षय वडाच्या झाडाला मोक्षचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार या झाडाच्या दर्शनानेच सर्व पापांचा नाश होतो आणि जीवन-मरणाच्या बंधनातून मुक्ती मिळते असे सांगतात.
पौराणिक मान्यतेनुसार, सृष्टीच्या प्रारंभी जेव्हा महापूर आला होता, तेव्हा अक्षय वड हे एकमेव वृक्ष होते, जे त्या महापूरात सुरक्षीत राहीले.
असे सांगितले जाते की, अक्षय वडाच्या एका पानावर भगवान बालरूपात आहे आणि ते सृष्टीचे शाश्वत रहस्य सांगताना दाखवले आहे. याला भगवान विष्णूच्या कृपेचे प्रतीक मानले गेले आहे.
जेव्हा भगवान राम वनवासा दरम्यान प्रयागराज आले होते, तेव्हा त्यांनी याच अक्षय वडाखाली विश्रांती घेतली होती. रामभक्तांसाठीही हे वटवृक्ष पवित्र मानले जाते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.