महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?

By Priyanka Chetan Mali
Jan 19, 2025

Hindustan Times
Marathi

प्रयागराजमध्ये सुरू असलेला महाकुंभ मेळ्यात देशाच्या काना-कोपऱ्यातून नागा साधू येतात. हे नागा साधू कुंभमेळ्यात खास आकर्षण असतात.

कुंभमेळ्यातील बहुतेक नागा साधू दोन विशिष्ट आखाड्यांमधून येतात. एक वाराणसीचा महापरिनिर्वाण आखाडा आणि दूसरा पंच दशनाम नावाचा जूना आखाडा.

परंतू कुंभमेळ्यानंतर हे नागा साधू दिसतच नाही. अशात प्रत्येकाला प्रश्न पडतो की हे कुठे चालले जातात.

नागा साधू इतर दिवसात दिगंबर स्वरूप म्हणजेच नग्न राहत नाहीत. समाजात दिगंबर स्वरूप स्वीकार नाही.

जेव्हा कुंभमेळा समाप्त होतो त्यानंतर नागा साधू आप-आपल्या आखाड्यात चालले जातात.

या आखाड्यात नागा साधू ध्यान-धारणा करतात. तसेच, धार्मिक शिक्षा पण देतात.

अनेक नागा साधू हिमालय, जंगल आणि इतर एकांत असलेल्या ठिकाणी जाऊन तपस्या करतात.

नागा साधू कुंभमेळ्यानंतर इतर तीर्थस्थळीही राहतात. प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जेन मध्ये राहतात.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS