भारतात रोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. यात खरेदी विक्री नागरिकांकडून केली जाते.
सध्या डिजिटलचा जमाना असला तरी काही ठिकाणी रोख रक्कमेत व्यवहार करावे लागतात.
भारतात सध्या ५००, १००, ५०, १० आणि ५ रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारात आहेत.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी २००० हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे.
तुम्ही रोज नोटांच्या स्वरूपात पैसे देऊन व्यवहार करत असतात. मात्र, या नोटा नेमक्या कुठे छापल्या जातात याची माहिती आहे का?
जर तुम्हाला भारतात नोटा कुठे छापल्या जातात याची माहिती नसेल आणि त्या बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.
भारतात चार जिल्ह्यात नोटांची छपाई केली जाते. यात नाशिक, देवास, मैसूर आणि सालबोनी
नाशिक हे महाराष्ट्रात तर देवास हे मध्यप्रदेशात आहे. हे दोन्ही नोटा छापण्याचे कारखाने भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत येतात.
Enter text Here
तर कर्नाटक मधील मैसूर तर पश्चिम बंगाल मधील सालबोनी येथे जे नोटा छापण्याचे कारखाने आहेत, ते रिझर्व बँकेच्या अंतर्गत येतात. रिझर्व बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडच्याद्वारे या नोटा छापल्या जातात.