जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी नारळ पाणी कधी प्यावे? 

pixabay

By Hiral Shriram Gawande
Feb 24, 2024

Hindustan Times
Marathi

उन्हाळा आला की रोज किमान एक ग्लास नारळ पाणी पिण्याची सवय लावा. दरम्यान दिवसाच्या कोणत्या वेळी ताजे नारळ पाणी प्यायल्याने आरोग्य फायदे दुप्पट होते ते पहा.

pixabay

नारळ पाण्यात पोटॅशियम सारखी खनिजे असतात. त्यामुळे ताजे नारळ पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच नारळाच्या पाण्यात मँगनीज, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि फायबरसारखे आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.

pixabay

व्यायाम करण्यापूर्वी नारळ पाणी पिणे चांगले. उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्यांपासून बचाव होतो आणि ऊर्जाही मिळते. त्यामुळे व्यायामानंतर प्रोटीन शेक पिण्याऐवजी नारळाचे पाणी पिणे चांगले आहे, जे इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले आहे. त्यामुळे थकवा येत नाही. 

pixabay

जेवण करण्यापूर्वी एक ग्लास नारळाचे पाणी पिण्याची सवय लावा. असे केल्याने आपण जास्त खाऊ शकणार नाही. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता खूपच कमी असते. ज्यांना पटकन वजन कमी करायचे आहे त्यांनी या टिप्स फॉलो करण्याची सवय लावावी.

pixabay

चिंता कमी करण्यास मदत होते. हृदयाची गती वाढण्यास प्रतिबंध करते. तणाव दूर करण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. हे तुमचे मन शांत करते आणि तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करते.

pixabay

नारळ पाणी प्यायल्याने यूरिनरी ट्रॅक साफ होतो. हे किडनीचे संक्रमण आणि किडनीच्या समस्यांपासून बचाव करते.

pixabay

बरेच लोक रात्री दारू पितात. सकाळी उठल्यानंतर त्यांना हँगओव्हरचा त्रास होतो. जास्त मद्यपान केल्याने शरीर डिहायड्रेट होऊ शकते. यामुळे डोकेदुखी आणि मळमळ होते. हा हँगओव्हर टाळण्यासाठी सकाळी उठून ताजे नारळ पाणी प्या.

pixabay

नारळ पाणी प्यायल्यानंतर त्याच्या आतील मलई खाल्ल्यास अल्सरची समस्या दूर होईल. कोरड्या जिभेची समस्या टाळण्यास मदत होते.

pixabay

बेली फॅट कमी करण्यास मदत करणारे ड्रिंक्स

freepik