अक्रोडमध्ये बायोटिन, व्हिटॅमिन बी ७ असते, जे केसांची ताकद वाढवते, केस गळणे कमी करते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
pixabay
अक्रोडमध्ये प्रथिने भरपूर असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी रोज पाच अक्रोड स्नॅक्स म्हणून खावे.
pixabay
अक्रोड खाल्ल्याने पित्ताशयातील खडे हळूहळू विरघळतात. मज्जासंस्थेची समस्येमुळे चक्कर येण्याची समस्या बरी होऊ शकते.
pixabay
अपचनाच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी रोज पाच अक्रोड खाल्ल्याने यापासून मुक्ती मिळते. तसेच अॅसिडचा स्राव नियंत्रित करते.
pixabay
अक्रोड शरीरातील कोरडेपणा दूर करते आणि त्वचा नेहमी मॉइश्चराइज ठेवते.
pixabay
अक्रोडमध्ये स्किन सूदिंग गुणधर्म आहेत. हे डोळ्यांखालील दाब कमी करण्यास, डार्क सर्कलची समस्या दूर करण्यास मदत करतात.
pixabay
हे अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे यांचे समृद्ध स्रोत आहेत. हे प्रदूषण आणि उष्णता यांसारख्या पर्यावरणीय घटकांमुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. फाइन लाइन्स, सुरकुत्या या एजिंग साइन दूर ठेवतात.
pixabay
अक्रोडमधील जीवनसत्त्वे त्वचेवरील काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी करतात. हे घटक त्वचेला स्मूथ आणि आतून चमकण्यास मदत करतात.
pixabay
जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार अक्रोड हे ओमेगा ३ आणि ओमेगा ६ अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचे समृद्ध स्त्रोत आहे.
pixabay
दोन्ही फॅटी अॅसिड्स जेव्हा योग्य प्रमाणात सेवन केले जातात तेव्हा त्वचेची जळजळ आणि संबंधित समस्या टाळण्यास मदत होते. ९५ ते ९९ टक्के लोक चांगल्या आरोग्यासाठी आवश्यकतेपेक्षा कमी ओमेगा ३ फॅटी अॅसिड वापरते, असे या अभ्यासात दिसून आले.
pixabay
संशोधकांनी असे सुचवले आहे की निरोगी आणि पौष्टिक त्वचेसाठी दररोज दोन किंवा तीन अक्रोड खाणे महत्वाचे आहे.