केवळ २२ व्या वर्षी पास झाली यूपीएससीची परीक्षा! देशात ५१ वी रँक घेत झाली आयएएस 

By Ninad Vijayrao Deshmukh
Dec 24, 2024

Hindustan Times
Marathi

२०२० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी अनन्या सिंह या प्रतिभाशाली आहेत. या सोबत त्या सुंदर देखील आहेत. 

अनन्या सिंह यांचा आयएएस अधिकारी होण्याचा प्रवास आजकालच्या तरुणांसाठी प्रेरणादाई ठरू शकतो. त्यांच्या या प्रवासाबद्दल माहिती घेऊयात. 

अनन्या सिंह यांचा जन्म २० फेब्रुवारी १९९८ मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव एम. के. सिंह तर आईचे नाव अंजली सिंह आहे. 

अनन्या लहानपणापासून अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे प्रयागराज येथून पूर्ण केले. अनन्या नेहमी क्लासमध्ये अव्वल यायच्या. 

अनन्या यांनी १२ पर्यंतचे शिक्षण इलाहबाद येथील मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून  पूर्ण केले. त्यांनी दहावीत ९६ टक्के तर बारावीमध्ये ९८. ५ टक्के मिळवले होते. 

महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनन्या या दिल्ली येथे गेल्या. त्यांनी लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकनॉमिक्स ऑनर्स मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. 

महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षांपासून अनन्या यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. 

ही परीक्षा पास करण्यासाठी अनन्या यांनी कठोर परिश्रम घेतले. त्या रोज १० ते १२ तास अभ्यास करायच्या 

वर्ष २०१९ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत संपूर्ण भारतातून ५१ रँक मिळवत अनन्या यांनी मोठ यश मिळवलं व त्या आयएएस अधिकारी झाल्या. 

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!