भाजपचे ९६ वर्षांचे लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर हा पुरस्कार मिळणारे ते भाजपचे दुसरे जेष्ठ नेते आहेत.  

By Ninad Vijayrao Deshmukh
Feb 05, 2024

Hindustan Times
Marathi

भारतरत्न मिळणारी व्यक्ति ही देशातील व्हीआयपी व्यक्ति असते. 

या व्यक्तीला प्रोटॉकॉल नुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, लोकसभा सभापती या सारख्या पदानंतर सर्वात महत्वाची पदानंतर जागा दिली जाते. 

राष्ट्रपती यांनी स्वाक्षरी केलेले एक प्रमाणपत्र आणि पदक हा पुरस्कार प्राप्त व्यक्तीला दिला जातो. 

भारतरत्न व्यक्तीला कोणत्याही प्रकारची रक्कम दिली जात नाही. त्याला कॅबिनेट मंत्री पदासारखा व्हीआयपी दर्जा मिळतो. 

भारतरत्न व्यक्तीला आयकर म्हणून सूट दिली जाते. ते संसदेच्या कोणत्याही सत्रात सहभाग घेऊ शकतात. तसेच स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवशी ते विशेष आथिति असतात. 

भारतरत्न मिळणाऱ्या व्यक्तीला बस, रेल्वे, विमान यातुन मोफत प्रवास करता येतो. कुठल्या राज्यात ही व्यक्ति गेल्यास त्यांना राज्य अथितिचा दर्जा मिळतो. 

 भारतरत्न व्यक्तीला सरकार वॉरंट ऑफ प्रेसिडेंटमध्ये जागा दिली जाते. यात सरकारी कामात या व्यक्तीला प्राधान्य दिले जाते. तर राज्य सरकार त्यांच्या राज्यात सुविधा देतात. 

संविधानाच्या अनुच्छेद १८ (१) च्या नुसार ही व्यक्ति नावात भारतरत्न वापरू शकत नाही. याचा वापर बायोडाटा, व्हिजिटिंग कार्ड, लेटर हेडवर केला जाऊ शकतो. 

लग्नाआधी मुलींनी अशी करावी मानसिक तयारी