किती शिकले होते डॉ. मनमोहन सिंग? त्यांनी कोणती पुस्तक लिहिली ? वाचा ! 

By Ninad Vijayrao Deshmukh
Dec 27, 2024

Hindustan Times
Marathi

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी निधन झालं. दोन वेळा पंतप्रधान राहिलेले सिंग यांनी त्यांचं जीवन राष्ट्राला वाहिलं. ते एक चांगले राजकारी, अर्थतज्ञ व विचारवंत होते. 

मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे रूप पालटले. त्यांनी देशाच्या विकासाला चालना दिली. सिंग हे देशाचे सर्वाधिक उच्च शिक्षित पंतप्रधान मानले जातात. त्यांनी चंदीगड येथील पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र शाखेतून पदवी घेतली आहे. 

पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त विषयात मास्टर पूर्ण केले. यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात टॉपमध्ये येत कोर्स पूर्ण केला. 

१९६२ मध्ये ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयाच्या नफील्ड कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडी पूर्ण केली. 

पंतप्रधान म्हणूनच नव्हे तर त्यांनी अर्थमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीमुळे ते कायम स्मरणात राहील. त्यांचा शोधनिबंध 'India's Export Trends and Prospects for Self Sustained Growth' भारतीय व्यापारावर महत्वाचं दस्ताऐवज बनला. 

मनमोहनसिंग यांनी काही पुस्तक देखील लिहिलीत. त्याच्यावर चित्रपट देखील बनले आहेत. द अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर हे त्यातील एक आहे. यावर चित्रपट देखील तयार करण्यात आला आहे. 

त्यांचं चेंजिंग इंडिया हे पुस्तक २०१८ मध्ये लिहिले. या पुस्तकात त्यांनी पंतप्रधान असतांना त्यांनी राबवलेल्या अनेक योजना केलेले आर्थिक व राजकीय कामे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. 

स्ट्रीक्टली पर्सनल: मनमोहन अँड गुरुशरण हे पुस्तक त्यांच्या मूलीने लिहिले आहे. यात त्यांनी त्यांच्या वडिलांचे जीवन चरित्र मांडलं आहे. मनमोहन सिंग यांनी स्वत: देखील अनेक पुस्तकं लिहिली आहेत. 

कोल्लेटरल फाइनेंशियल प्ल्म्बींग, श्याडो बैंकिंग; इक्नोमिक्स एंड पॉलिसी, मेकिंग ओटीसी डेरिवेटिव सेफ; अ फ्रेश लूक, टु द नेशन एंड फॉर द नेशन, इन घोस्ट'स डेन, चिल; इंस्टीट्यूशन एंड पॉलिसीस अंडरपिनर्निंग स्टेबिलिटी एंड ग्रोथ, द कुएस्ट फॉर इक्यूटी इन डेव्लपमेंट या प्रकारची अनेक पुस्तके मनमोहन सिंग यांनी लिहिली आहेत. 

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!