का केले जाते कामदा एकादशीचे व्रत? जाणून घ्या फायदे...
By
Harshada Bhirvandekar
Apr 18, 2024
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात कामदा एकादशीला भरपूर महत्त्व आहे. यावेळी १९ एप्रिल २०२४ रोजी कामदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे.
कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते.
असे मानले जाते की, या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान विष्णू आपल्या सगळ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करतात.
यामुळेच या दिवसाला फलदा एकादशी किंवा कामदा एकादशी असेही म्हणतात.
फलदा म्हणजे फळाची प्राप्ती आणि कामना म्हणजे इच्छा पूर्ण करणारी अशी ही एकादशी आहे.
प्रत्येक एकादशीचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व आहे. कामदा एकादशीच्या व्रताचे महत्त्व श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते.
तुमचा पती किंवा अपत्य एखाद्या वाईट सवयींना बळी पडले असेल, तर तुम्ही कामदा एकादशीचे व्रत करू शकता.
असे मानले जाते की, हे व्रत केल्याने व्यक्तीला दैत्य योनीपासून मुक्ती मिळते. हे व्रत केल्याने तुम्हाला स्वर्गप्राप्ती होते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा