नऊवारी साडीत किरण रावचा जलवा!

By Harshada Bhirvandekar
Jan 02, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांच्या लेकीच्या लग्नाची लगबग आता सुरू झाली आहे.

आयरा खानच्या लग्नाच्या निमित्ताने आता आमिर खानच्या घरी हळद आणि इतर सोहळ्यांची तयारी सुरू आहे. 

आयरा खानच्या लग्नासाठी आता किरण राव आणि रीना दत्ता दोघीही आमिरच्या घरी पोहोचलया आहेत.

यावेळी आमिर खानची पूर्वपत्नी किरण राव हिने सुंदर नऊवारी साडी नेसली होती. 

लिलॅक रंगाच्या नऊवारी साडीत किरण राव खूप सुंदर दिसत आहे. 

हातात हळद आणि मेहंदीची थाळी घेऊन किरण राव आयरा खानच्या लग्नासाठी सज्ज झाली आहे.

आयरा खानच्या लग्नासाठी किरण राव आणि रीना दत्ता दोघीही नऊवारीत सजल्या आहेत.   

आयरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्नबंधात अडकणार आहे.

उद्या म्हणजेच ३ जानेवारीला नुपूर शिखरे आणि आयरा खान लग्न बंधनात अडकणार आहेत.

लग्नाआधी मुलींनी अशी करावी मानसिक तयारी