किम कार्दशियन मुंबईत आली अन् ऑटो रिक्षाच्या प्रेमात पडली!
By
Harshada Bhirvandekar
Jul 12, 2024
Hindustan Times
Marathi
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा बहुचर्चित लग्न सोहळा आज पार पडणार आहे.
या लग्नासाठी अनेक हॉलिवूड सेलेब्स भारतात आले आहेत. या लग्नात किम कार्दशियन सहभागी होणार आहे.
हॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय असणारी किम कार्दशियन आता या लग्नासाठी भारतात आली आहे.
भारतात येताच किम कार्दशियनमुळे प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.
किम कार्दशियन भारतात येताच ऑटो रिक्षाच्या प्रेमात पडली आहे. तिच्या या प्रेमामुळे प्रशासन गोंधळात पडलं.
किम कार्दशियनला मुंबईत आल्यावर ऑटो रिक्षात बसून खास फोटोशूट करायचे आहे.
लालबाग मार्केट, सिद्धीविनायक मंदिर, ताज हॉटेल या भागात तिला हे फोटोशूट करायचे आहे.
आता मुंबईतील या प्रसिद्ध भागांमध्ये ऑटो रिक्षावर बंदी आहे. साऊथ मुंबईत रिक्षा धावत नाहीत.
त्यामुळे आता तिला परवानगी देण्यावरून परिवहन आणि वाहतूक विभागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा