खरमास ही सनातन धर्मातील ज्योतिषशास्त्रीय घटना आहे. ज्योतिषांच्या मते, जेव्हा सूर्य धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो.
यंदा खरमास १३ मार्च ते १३ एप्रिल २०२४ या काळात सुरू राहणार आहे.
खरमास दरम्यान विवाह, मुंज, गृहप्रवेश करणे यांसारखे शुभ कार्य केले जात नाही. कारण खरमासचा महिना अशुभ मानला जातो.
पण खरमास दरम्यान काही राशींवर धनवर्षा होण्याची शक्यता आहे. कारण या राशींवर सुर्यदेवाची कृपा होणार आहे.
मेष राशीच्या लोकांना खरमास काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मेष राशीचे लोक सर्व क्षेत्रात यश मिळवू शकतात.
मेष
या कालावधीत, प्रलंबित काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल. एकूणच मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला जाणार आहे.
मिथुन राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील. ज्योतिषांच्या मते, या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
मिथुन
धनु राशीच्या लोकांना खरमासात विशेष लाभ होणार आहे. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळू शकतात.पण या काळात कोणतेही शुभ कार्य करू नका, अडथळे येऊ शकतात.
धनु
मीन राशीच्या नोकरीच्या क्षेत्रात यश मिळेल. व्यापारातही वाढ होण्याची शक्यता आहे.
मीन
पैसे गुंतवणुकीच्या योजनांवर काम करणाऱ्यांनाही या काळात यश मिळेल. पण या काळात कोणतेही नवीन काम करू नका, शुभ परिणाम मिळणार नाहीत.