घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा

By Rohit Bibhishan Jetnavare
Feb 24, 2024

Hindustan Times
Marathi

प्रत्येक घरात तिजोरी असते, त्यात लोक पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवतात. 

पण लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी तिजोरीत काही गोष्टी ठेवण्याचे वास्तू शास्त्रात सांगण्यात आले आहे.

हिंदू धर्मात, तिजोरीचा संबंध माता लक्ष्मीशी आहे. त्यामुळे तिजोरी कधीच रिकामी ठेवू नका.

तिजोरीत कमळाच्या फुलावर विराजमान असलेल्या माता लक्ष्मीचा फोटो ठेवल्याने धनाची कमतरता दूर होते.

लाल किंवा पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून तिजोरीत ठेवावी. यामुळे धन आकर्षित होतं.

पूजेच्या सुपारीमध्ये गणपती आणि गौरीचा वास असतो, त्यामुळे ही सुपारी तिजोरी ठेवल्याने धन आकर्षित होते.

तुपात लाल चंदन मिसळून पिंपळाच्या पानावर ॐ लिहा आणि हे पान तिजोरीत ठेवा. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

तिजोरीत उत्तर दिशेला चांदीचे नाणे ठेवा. चांदीच्या नाण्यात लक्ष्मीचा वास असतो. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.  

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान