तुळशीपासून दूर ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर होईल सत्यानाश!

By Harshada Bhirvandekar
Apr 03, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात तुळशी पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तुळशीची पूजा केल्याने घरातील सुख समृद्धी वाढते.

पण काही वस्तू तुळशीच्या रोपाजवळ किंवा तुळशी असलेल्या भांड्याजवळ ठेवू नये. 

तुळशीच्या रोपाजवळ कधीही केराच डबा किंवा झाडू ठेवू नये, कारण या गोष्टी घराच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जातात. 

त्यामुळे या गोष्टी शुद्ध नाहीत. तुळशीच्या रोपाजवळ अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकते.

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीजवळ कधीही गणपतीची मूर्ती ठेवू नये. यामागे एक पौराणिक कथा आहे. 

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग देखील ठेवू नये. असे मानले जाते की, तुळशीचे मागील जन्मातील नाव वृंदा होते.

वृंदा ही जालंदर राक्षसाची पत्नी होती. जालंदरचे अत्याचार वाढू लागले, तेव्हा भगवान शिवाने त्याचा वध केला होता.

घरामध्ये जिथे तुळशीचे रोप असेल, तिथे चपला ठेवू नका. असे केल्याने आर्थिक संकट येऊ शकते. 

तुळशीजवळ काटेरी झाडे ठेवू नयेत. तुळशीजवळ काटेरी रोप ठेवल्याने घरात नकारात्मकता पसरते.

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स

pixabay