मुलगी होणार की मुलगा? कार्तिकी गायकवाड म्हणाली... 

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 02, 2024

Hindustan Times
Marathi

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ फेम कार्तिकी गायकवाड आता आई होणार आहे.

Photo: Instagram

नुकतेच तिने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे.  

Photo: Instagram

सोशल मीडियावर डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करताना आपल्याला खूप आनंद झाल्याचं कार्तिकी म्हणाली. 

Photo: Instagram

तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत.

Photo: Instagram

या दरम्यान कार्तिकीने आपल्याला मुलगी होणार की, मुलगा यावर भाष्य केला आहे.  

Photo: Instagram

कार्तिकी गायकवाड म्हणाली की, मी असा काहीही विचार केलेला नाही. मुलगाही चालेल आणि मुलगीही चालेल. 

Photo: Instagram

मात्र, माझ्या बाळाचं आरोग्य उत्तम असू दे. माझ्या होणाऱ्या बाळांने घरातल्यांची, मोठ्यांची, देशाची सगळ्यांची सेवा करावी आणि सुसंस्कृत असावे, इतकीच आमची अपेक्षा आहे. 

Photo: Instagram

आमच्या परीने आम्ही त्याला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करू. पुढे जाऊन माझ्या बाळांने माझ्याप्रमाणे गाण्याची परंपरा पुढे कायम ठेवावी, अशी माझी इच्छा आहे. 

Photo: Instagram

मात्र, ही माझी इच्छा असून मी त्याच्यावर किंवा तिच्यावर कधीच ती लादणार नाही, असं देखील कार्तिकी गायकवाड म्हणाली.

Photo: Instagram

किती समस्या सोडवू शकते बटाट्याची साल?