कर्ज फिटत नाही? हे उपाय करा

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 07, 2024

Hindustan Times
Marathi

आजच्या काळात लोक आपले आयुष्यमान वाढण्यासाठी कर्ज घेतात.लोभामुळे, लोक अनेकदा त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त कर्ज घेतात आणि त्यात बुडतात. 

या कर्जाची परतफेड करताना व्यक्तीची आर्थिक स्थिती ढासळू लागते. अशा स्थितीत संपूर्ण कुटूंबाला याचा फटका बसतो.

तुम्हीही कर्जामुळे त्रस्त असाल आणि कष्ट करूनही कर्जमुक्ती होत नसेल तर ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. 

या उपायांचा अवलंब करून तुम्ही कर्जाच्या समस्यांपासून सहज सुटका मिळवू शकता.

कर्जमुक्तीचे मार्ग 

१) मेहनत करूनही कर्ज फिटत नसेल तर शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. तसेच ४ बाजूंनी दिवा लावावा. 

यानंतर, झाडाची प्रदक्षिणा करा आणि कर्जमुक्त होण्यासाठी प्रार्थना करा. असे मानले जाते की या उपायाने कर्ज कमी होण्यास सुरुवात होते आणि आर्थिक लाभ होतो.

१) शनिवारी आंघोळ केल्यानंतर आपल्या उंचीचा धागा घ्या. नारळाभोवती गुंडाळा. तो वाहत्या पाण्यात तरंगवा. असे केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते.

३) मंगळवारी नारळावर चमेलीचे तेल लावून त्यावर लाल सिंदूर लावून स्वस्तिक बनवावे. हे नारळ बजरंगबलीला अर्पण करा. 

४) मंगळवारी शिवमंदिरात शिवलिंगाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा आणि मसूर अर्पण करा. त्यानंतर तेथे ऋन्मुक्तेश्वर मंत्र ओम रिंमुक्तेश्वर महादेवाय नमः चा १०८ वर जप करा.

५) ज्योतिष शास्त्रानुसार, मूग उकळून त्यात तूप-साखर मिसळून गायीला खाऊ घातल्यास कर्जातून लवकर सुटका होते.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान