बॉलिवूड अभिनेत्री कंगना हिने अनेक महिला प्रधान चित्रपटांमध्ये काम केले असून, अभिनेत्री केवळ स्वतःच्या बळावर चित्रपट गाजवू शकते, हे तिने सिद्ध केले आहे.
कंगना रनौत हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राजकारणावरही तिने अनेक चित्रपट केले आहेत.
आता कंगना राजकारणातही नशीब आजमावत आहे. भाजपने तिला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभेचे तिकीट दिले आहे.
लोक अनेकदा कंगना कितवी शिकली आहे आणि तिचं शिक्षण कुठे झालं आहे? हे सर्च करताना दिसतात.
कंगना रनौत हिचे सुरुवातीचे शिक्षण हिमाचल प्रदेशातील हिल व्ह्यू स्कूलमधून झाले आहे.
कंगनाने पुढचे शिक्षण चंदिगडच्या डीएव्ही स्कूलमधून घेतले आहे. ती विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण झाली आहे.
कंगनाच्या आई-वडिलांचे स्वप्न होते की, आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे. पण, कंगनाने कधीच पुढची परीक्षा दिली नाही. तिने बारावीतच शिक्षण सोडले.
कंगनाला मॉडेलिंगची आवड होती. त्यामुळे तिने आपले शिक्षण अर्धवट सोडून चित्रपटात करिअर करण्यासाठी मुंबईच्या दिशेने धाव घेतली.
मुंबईत येऊन कंगनाने मॉडेलिंग केले आणि थिएटरमध्येही काम केले. त्यानंतर तिने ‘गँगस्टर’ चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते.
या चित्रपटात सुरुवातीला तिला नाकारण्यात आलं. मात्र, नंतर तिची निवड झाली आणि या चित्रपटातून कंगनाने आपल्या करिअरची सुरुवात केली.
मंगळ दोषाचा परिणाम कमी करण्यासाठी करा या ३ गोष्टींचे दान