घरात किंवा दुकानात या दिशेल ठेवा कामधेनू गाय

By Rohit Bibhishan Jetnavare
Feb 20, 2024

Hindustan Times
Marathi

तुम्ही अनेक घरांमध्ये किंवा दुकानांमध्ये कामधेनू गाय पाहिली असेल, त्या गायीच्या संपूर्ण शरीरावर देवी-देवतांचे चित्रण असते.

कामधेनू ही शुद्ध पांढरी गाय आहे. या गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवता वास करतात. समुद्रमंथनापासून या कामधेनू गायीची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते.

देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली, त्यापैकी कामधेनू कामधेनू गाय हे एक रत्न आहे. 

अशी मान्यता आहे, की समुद्रमंथनाच्या वेळी एक मोठा आवाज आला आणि जेव्हा देव आणि दानवांनी वर पाहिले तेव्हा त्यांना कामधेनू दिसली.

वास्तू शास्त्रानुसार, घर किंवा दुकांनामध्ये कामधेनू गाय ठेवल्यास अनेक लाभ मिळतात.

वास्तूनुसार, कामधेनू गाय घरात किंवा दुकाना ईशान्य दिशेला ठेवणे सर्वेत्तम आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा संचारते.

तुम्ही चांदी, पितळ किंवा तांब्यापासून बनवलेली कामधेनू गायीची मुर्ती घरात किंवा दुकानात ठेवू शकता. सर्व धातू पवित्र मानले जातात.

आर्थिक उत्पन्न वाढीसाठी तुम्ही घरातील तिजोरी किंवा दुकानीतल गल्ल्याजवळ कामधेनूची मुर्ती ठेवू शकता. तिची रोज पूजा करा.

जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर कामधेनूची मुर्ती घरात किंवा दुकानात  दक्षिण-पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात ठेवा.

सोबतच, कामधेनूला घराच्या मुख्य दरवाजातही ठेवू शकता. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.  

महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?