जया एकादशीच्या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये?

By Priyanka Chetan Mali
Feb 05, 2025

Hindustan Times
Marathi

शनिवार ८ फेब्रुवारी २०२५ रोजी जया एकादशीचे व्रत केले जाईल. या दिवशी विष्णू देवाची आणि लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केली जाते.

असे सांगितले जाते की, जया एकादशीला विष्णूच्या पूजेने जीवनात सुख-समृद्धी येते.

जया एकादशीला खाण्या-पिण्याच्या काही नियमांची खास काळजी घ्यावी. नियम न पाळल्याने पूजा अपूर्ण राहू शकते आणि उपवास सुटू शकतो.

जया एकादशीला रताळे, शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ खाऊ शकतात. दूध, दही आणि फळे खाऊ शकतात.

भगवान विष्णूला पंचामृताचा नैवेद्य दाखवा आणि प्रसाद म्हणून स्वत: घ्या. उपवासादरम्यान बाहेरची मिठाई नैवेद्य म्हणून ठेऊ नका.

जया एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी फक्त फराळ करावा.

जे लोक या दिवशी उपवास करत नाही त्यांनीही खाण्या-पिण्याची पथ्य पाळली पाहिजे.

उपवास करणाऱ्यांनी मीठ खाऊ नये. लसूण, कांदा आणि मसूर डाळही खाऊ नये.

एकादशीच्या दिवशी तांदूळ-भात खाऊ नये.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

बिग बॉस फेम आयशा खानच्या बोल्ड अदांवर चाहते फिदा