जया एकादशीला विष्णू देवाला अर्पण करा या पदार्थांचा नैवेद्य
By
Priyanka Chetan Mali
Feb 07, 2025
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्व आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी म्हणतात.
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. असे सांगितले जाते की, या दिवशी पूजा केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
असे सांगितले जाते की, जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा आवडता पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला पाहिजे. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात.
असे सांगितले जाते की, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला केळ्याचा नैवेद्य अर्पण केल्यास गुरुदोष दूर होतो आणि जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात.
जया एकादशीच्या खास प्रसंगी भगवान विष्णूला केसरची खीर किंवा शिऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. असे सांगितले जाते की, केसरमिश्रीत पदार्थ देवाला प्रिय आहेत.
जया एकादशीला मनोभावे धण्याची पंजीरी आणि पंचामृतचा नैवेद्य अर्पण केल्याने श्रीहरीची कृपा प्राप्त होते.
जया एकादशीला श्रीहरीला चंपा, झेंडू, जाई, कदम, केवडा, केतकी, वैजयंती आणि तुळशीची मंजिरी अर्पण करावीत.
एकादशीला देवाच्या आवडीची ही फुले अर्पण केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात, आणि सर्व इच्छा पूर्ण करतात असे सांगितले जाते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
पुढील स्टोरी क्लिक करा