जया एकादशीला या चुका टाळा
By
Rohit Bibhishan Jetnavare
Feb 19, 2024
Hindustan Times
Marathi
जया एकादशी मंगळवारी (२० फेब्रुवारी) साजरी केली जाणार आहे.
जया एकादशीला भगवान विष्णूची उपासना केली जाते. या दिवशी श्रीहरीच्या नावाचा उपवास करतो, त्याला इच्छित फळप्राप्ती होते.
जया एकादशीला भीष्म एकादशी किंवा भूमी एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी खूपच महत्वाची मानली जाते.
ज्योतिषांच्या मते, जया एकादशीला आपल्याकडून काही चुका होणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे.
जया एकादशीला तुळशीला जल अर्पण करून नये. तसेच, तुळशीची पानेदेखील तोडू नये.
एकादशीच्या दिवशी तांदूळ आणि जवसाचे सेवन करू नये.
शास्त्रानुसार या दिवशी भात खाणे वर्ज्य आहे. भात खाल्ल्याने मनाची एकाग्रत भंगते आणि उपवासाचा उद्देश सफल होत नाही.
एकादशीला पलंग किंवा गादीवर न झोपता जमिनीवर झोपावे. तसेच, या दिवशी मांस आणि मादक पदार्थांचे सेवन करू नये.
एकादशीच्या दिवशी राागावर नियंत्रण ठेवा, तसेच, तोंडातून अपशब्द बाहेर पडणार नाहीत, याची काळजी घ्या.
अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी आहे तरी कोण?
पुढील स्टोरी क्लिक करा