जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष

By Rohit Bibhishan Jetnavare
Aug 27, 2024

Hindustan Times
Marathi

BCCI चे सचिव जय शाह ICC चे अध्यक्ष बनले आहेत. ICC अध्यक्ष बनणारे ते सर्वात तरुण भारतीय आहेत. 

जय शहा यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारली आहे. जय शहापूर्वी भारतातील इतर दिग्गजांनी हे पद भूषवले होते. 

महत्त्वाची बाब म्हणजे जय शहा यांची ICC अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आता ते १ डिसेंबरला पदभार स्वीकारतील. 

यासाठी जय शाह यांना बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागणार आहे.

आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आहेत. त्यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत आहे. 

यानंतर जय शहा हे पद स्वीकारतील. २० ऑगस्ट रोजी आयसीसीने याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. 

बार्कले हे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. २०२० पासून ते या पदावर होते.

जय शाह यांच्या आधी ४ भारतीय दिग्गज ICC चे अध्यक्ष राहिले आहेत.

जगमोहन दालमिया १९९७ ते २०००. त्यानंतर २०१० ते २०१२ पर्यंत शरद पवार ICC अध्यक्ष होते. 

तर एन श्रीनिवासन हे २०१४-१५ दरम्यान ICC चेअरमन होते. यानंतर शशांक मनोहर २०१५-२०२० पर्यंत ICC अध्यक्षपदी होते. 

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!