अंबानींचा थाटच न्यारा; जान्हवी कपूरने शेअर केलेले फोटो बघाच!

By Harshada Bhirvandekar
Apr 15, 2024

Hindustan Times
Marathi

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी या वर्षी जुलैमध्ये राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे.

जामनगरमध्ये तीन दिवस चाललेल्या प्रीवेडिंग सोहळ्यानंतर आता नववधू राधिकाच्या मैत्रिणींनी ब्राइडल शॉवरचे आयोजन केले होते. 

स्वत: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने या खास सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

राधिका मर्चंटसाठी हा ब्रायडल शॉवर बोनी कपूरच्या लेकीने आयोजित केल्याचे बोलले जात आहे. 

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यांच्याशी राधिका मर्चंटची घट्ट मैत्री आहे. 

जान्हवी आणि शिखर यांनी जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीलाही हजेरी लावली होती.

राधिका मर्चंटच्या इतर मित्रमैत्रिणींनी या ब्रायडल शॉवरचे हे फोटो शेअर केले आहेत. 

‘धडक’ स्टार जान्हवी कपूर हिनेही हे फोटो आपल्या इन्स्टा हँडलवर शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत.

गणपतीची पूजा करताना करू नका ‘या’ चुका; होईल कोप!