चाळीत राहिलेले ‘हे’ कलाकार आहेत कोट्यवधींचे मालक!
By
Harshada Bhirvandekar
Aug 06, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेता जॅकी श्रॉफ एकेकाळी चाळीत राहत होता. आजही अभिनेता चाळीत जाऊन अनेक लोकांना भेटतो आणि त्यांना मदत करतो.
दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध होते. अभिनय क्षेत्रात करिअर करत असताना सुनील चाळीत राहत होते.
अभिनेता आणि कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी बऱ्या संघर्षानंतर अभिनय क्षेत्रात आपले स्थान मिळवले आहे. जॉनी लिव्हर यांचे बालपण मुंबईतील एका चाळीत गेले आहे.
अभिनेता गोविंदाला चित्रपट जगतातील सुपरस्टार म्हटले जाते. गोविंदा आज करोडोंचा मालक आहे. पण एकेकाळी तोही चाळीत राहत होता.
अभिनेता अर्शद वारसीनेही मुंबईतील चाळींमध्येच दिवस काढले आहेत.
अभिनेते अनुपम खेर प्रेक्षकांचे नेहमीच भरपूर मनोरंजन करतात. मात्र, संघर्षाच्या काळात अनुपम खेर एका चाळीत राहत होते.
बॉलिवूडचा हँडसम हंक विकी कौशल हा देखील चाळीतच राहत होता. विकीचं बालपण मुंबईतल्या चाळींमध्ये गेलं आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारी हे चित्रपट क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. पण एकेकाळी ती देखील चाळीतच राहत होती.
बिहारमधून आलेल्या मनोजने सुरुवातीला मुंबईतील चाळीमध्ये राहून दिवस काढले होते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा