इस्रोने भारताच्या अंतराळातील पहिल्या स्पेस स्टेशन तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
इस्रो प्रमुखांनी याबाबत माहिती देतांना सांगितले आहे की, स्पेस स्टेशनचे पहिले मॉड्यूल लवकरच तयार करण्यात येणार असून येत्या काही वर्षात ते अंतराळात पाठवले जाणार.
हे स्पेस स्टेशन इस्रोला २०३५ पर्यंत पूर्ण करायचे आहे.
हे स्पेश अशा पद्धतीने बनवले जाणार आहे जेणेकरून यात चार ते पाच अंतराळवीर राहू शकतील
या स्पेश स्टेशनचे वजन अंदाजे ४०० टन राहणार आहे.
या स्पेस स्टेशनमध्ये चार वेगवेगळे मॉड्यूल राहणार आहे आणि चार पेक्षा अधिक सोलार पॅनल लावले जाणार आहे.
या स्पेस स्टेशनमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी सेफ्टी क्रू मॉड्यूल एस्केप सिस्टम देखील असेल.
स्पेस स्टेशनचे एक टोक क्रू मॉडेल आणि रॉकेटसाठी डॉकिंग पोर्ट असेल
भारतीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीच्या कक्षेत स्थापित
केले जाईल.